महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’: दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन सत्रे,सादरीकरणे
हे प्रदर्शन नवसंकल्पनांतून आधुनिकतेकडे नेईल :गणेश निबे
पुणे : ‘सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्रीचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ मधे दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२५ फेब्रुवारी रोजी चर्चासत्रे,प्रेरक मार्गदर्शन,दालनांना भेटी आणि मिलिटरी बँडचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,तसेच प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी दररोज एक याप्रमाणे भारतीय सैन्यदलाचे प्रमुख भेट देणार आहेत.
या महाप्रदर्शनाच्या संयोजकांच्या वतीने तसेच प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर असलेल्या निबे लिमिटेड या कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. ‘प्रदर्शनातील वैविध्यामुळे भारतीय सैनिकाला सदैव पुढे नेणारे प्रदर्शन अशी या प्रदर्शनाची नोंद होईल’,असा विश्वास निबे लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी व्यक्त केला आहे.
सैन्यदलासाठी निर्माण केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे,तंत्रज्ञान,प्रणाली या दालनांमधून मांडण्यात येणार असून प्रदर्शनाला येणाऱ्या सर्वांना त्याची माहिती देण्यात येणार आहे.ही तयारी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. निबे लिमिटेड ही कंपनी ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ ची नॉलेज पार्टनर आहे . एल अँड टी,सोलर ग्रुप,टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स ,भारत फोर्ज लिमिटेड हे स्ट्रॅटेजिक पार्टनर असून उद्योग विभाग महाराष्ट्रच्या वतीने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) च्या सहकार्याने हे महाप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी भेट दयावी,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
चर्चासत्रे,प्रेरक मार्गदर्शन,दालनांना भेटी आणि एअर फोर्स बँड चे सादरीकरण दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता नेव्ही बँड चे सादरीकरण होणार आहे.साडे नऊ ते पावणे दहा वाजता इंडियन मेरीटाईम हिस्टरी विषयी सादरीकरण करण्यात येणार आहे.नंतर ‘भारतीय नौदलाचे स्वदेशीकरण’ विषयावर सादरीकरण होईल.दहा वाजता राज्य शासनाच्या धोरणाविषयी उद्योग विभागाचे सहसचिव सदाशिव सुरवसे मार्गदर्शन करतील.साडे दहा वाजता ब्रिगेडियर विश्वजित घोष मार्गदर्शन करतील.११ वाजता डिफेन्स स्टार्टअप वर माजी सुरक्षा सचिव डॉ.अजय कुमार यांच्या उपस्थितीत खुली चर्चा होणार आहे.
साडेअकरा वाजता ‘तंत्रज्ञान विषयक सार्वभौमत्व’ या विषयावर लेफ्टनंट जनरल अनिल कपूर संवाद साधतील.दुपारी १२ वाजता ‘उद्योजकांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी ‘ या विषयावर डॉ.चंद्रिका कौशिक मार्गदर्शन करतील.१२.३५ वाजता डी आर डी ओ उद्योग क्षेत्राविषयीच्या भूमिकेविषयी अरुण चौधरी मार्गदर्शन करतील.१२.५० वाजता तंत्रज्ञान विकास फंड या विषयावर निधी बन्सल माहिती देतील .१ वाजता ‘आधुनिक निर्मितीची तपासणी आणि गुणांकन ‘याविषयी व्हाईस ऍडमिरल रणजित सिंग माहिती देतील.पावणे दोन वाजता डी आर डी ओ चे प्रमुख डॉ.समीर कामत हे उपस्थितांना संबोधित करतील. अडीच वाजता ‘लघु,सूक्ष्म आणि मध्यम उद्योग आणि विद्यार्थी ‘ या विषयावर डॉ.चंद्रिका कौशिक मार्गदर्शन करतील.
३ वाजता एअर मार्शल विभास पांडे मार्गदर्शन करतील.साडे तीन वाजता ‘रोल ऑफ डी ए डी ‘ विषयावर एअर कमोडोर अतुल आनंद मार्गदर्शन करतील.६ वाजता एडमिरल आर.हरी कुमार हे नेव्ही पॅव्हिलियनला भेट देतील.सव्वा सहा वाजता एअर फोर्स बँड चे सादरीकरण होईल.
‘महाराष्ट्र्र डिफेन्स हब’ ची पायाभरणी*भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ ,’मेक इन इंडिया’ या संकल्पनेतून प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्यात संरक्षण क्षेत्रास बळकटी देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र्र डिफेन्स हब उदयास येत आहे. त्याचीच पायाभरणी म्हणून अभिमान, समृद्धि आणि शक्तिचे स्थान असलेल्या, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जन्माने पावन झालेल्या पुण्यभूमी मध्ये दिनांक २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मोशी, पुणे येथे महाराष्ट्र एम एस एम ई डिफेन्स एक्सपो २०२४ चे आयोजन करण्यात आले .
संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून हे महा प्रदर्शन आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारे असेल,प्रेरणादायी ठरेल,असे गणेश निबे यांनी सांगितले. या महाप्रदर्शनात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जे विद्यार्थी उपस्थित आहेत ,त्यांना नव्या युगाची फ्युचर टेक्नॉलॉजी ,प्रगत संशोधन पाहण्याची,उद्योगांशी संवाद साधण्याची संधी मिळात आहे.त्यांच्या कारकिर्दीसाठी ते दिशादर्शक आणि प्रेरक ठरेल असा मला विश्वास आहे,पुढील काही दिवसातच भारत हा या क्षेत्रातील महाशक्ती म्हणून आणि एक श्रेष्ठ निर्यातदार म्हणून ठसा उमटवेल.
शस्त्रास्त्रांचा एक खरेदीदार ते अत्याधुनिक शस्त्रास्त्रे,संरक्षण सामग्री ,प्रणाली ,कॉम्बॅट व्हेइकल्स,क्षेपणास्त्रे ,सबमरीन ,एयरक्राफ्ट कॅरिअर्स चा श्रेष्ठ निर्यातदार म्हणून आपला देश उभा राहत आहे . केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे निश्चितच दूरदर्शी आणि उपयुक्त सिद्ध झाली आहेत,असेही त्यांनी सांगितले.