एडीपी इंडियाने गाठला मोठा टप्पा
भारतात कार्यसंचालनांची २५ वर्षे केली साजरी
पुणे – एडीपी प्रायव्हेट लिमिटेड या ह्युमन रिसोर्सेस्, मॅनेजमेंट सॉफ्टवेअर अँड सर्विसेसच्या आघाडीच्या प्रदाता कंपनीने पुण्यात २७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यातील त्यांच्या १३०० हून अधिक सहयोगींसह भारतातील कार्यसंचालनांच्या २५ वर्षांचा टप्पा साजरा केला. थिंक बीयॉण्ड थीम असलेल्या या कार्यक्रमात मेजर अकाऊंट सर्विसेस व एडीपी कॅनडाच्या अध्यक्षा श्रीमती लॉरा ब्राऊन आणि ग्लोबल चीफ इन्फर्मेशन ऑफिसर प्रकाश उपाध्ययुला यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पसरले होते, जेथे हजारो सहयोगी एकत्र आले आणि एडीपी इंडिया सीएसआर उपक्रम असलेल्या ‘तरंगचे’ पाठबळ असलेल्या एनजीओ व शाळांमधील मुलांच्या उत्साहवर्धक डान्स परफॉर्मन्सचा आनंद घेतला. यानंतर काही व्यवसाय पुरस्कार देण्यासोबत उत्साहवर्धक एडीपी स्टुडिओ म्युझिकल बँड, नाट्य, ढोल आणि सहकाऱ्यांचे डान्स परफॉर्मन्स सादर करण्यात आले.
या इव्हेण्टप्रसंगी मत व्यक्त करत एडीपी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व महाव्यवस्थापक श्री. विजय वेमुलापल्ली म्हणाले, “आजचे सेलिब्रेशन एडीपी इंडियाच्या प्रवासामधील मोठा टप्पा आहे, जो वर्षानुवर्षे आमच्या यशाला नव्या उंचीवर घेऊन गेलेल्या नाविन्यता आणि सर्वोत्तम सेवेचे प्रतीक आहे. मी आमचे जागतिक नेतृत्व, क्लायण्ट्स आणि सर्वात महत्त्वाचे आमचे सहयोगी व त्यांच्या कुटुंबियांचे अविरत पाठिंब्यासाठी आभार व्यक्त करतो. त्यांनी एडीपी इंडियाच्या अविश्वसनीय विकासाला चालना दिली आहे. या उपलब्धीमधून गतकाळातील कामगिरीसह आम्ही सहयोगाने घडवत असलेले उज्ज्वल भविष्य देखील दिसून येते, ज्याला समान दृष्टिकोन व कटिबद्धतेचे पाठबळ आहे.”
एडीपी प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय उपाध्यक्ष व एचआर प्रमुख श्री. सुज्ञान वेंकटेश म्हणाले, “एडीपीचा विकास व नाविन्यतेप्रती प्रवास कामाच्या भवितव्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. भारतातील आमचे सहयोगी एडीपीचे मिशन, दृष्टिकोन आणि संस्कृतीला प्रगत करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, तसेच कंपनीला नवीन आव्हानांचा सामना करण्यासोबत उदयास येणाऱ्या संधींचा फायदा घेण्यास सक्षम करत आहेत. आम्ही विकासाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करत असताना आमची टीम नेतृत्व करण्यास उत्तमरित्या सुसज्ज आहे आणि त्यांचे योगदान जागतिक स्तरावर एडीपीच्या यशासाठी महत्त्वपूर्ण राहिल.” १९९९ मध्ये १०२ सहयोगींनी भारतात कार्यसंचालनांना स्थापित केले आणि ७ वर्षांनंतर २००७ मध्ये एडीपीने पुण्यामध्ये उत्पादन विकास व आयटी-सक्षम सेवा कार्यसंचालनांना सुरूवात केली.
आज, एडीपीने पुण्यामध्ये मोठी प्रगती केली आहे, जेथे ३४०० हून अधिक सहयोगींचा समूह असण्यासोबत भारतात एकूण १२,८०० सहयोगी आहेत. एडीपी इंडिया जागतिक स्तरावर एडीपीच्या यशामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देते, २५ टक्के सर्विस कंपन्या आणि ३४ टक्के तंत्रज्ञान टीम्स येथे आहेत. यामधून भारतातील व जगभरातील बाजारपेठांमध्ये कंपनीची मोठी कामगिरी आणि योगदान दिसून येते.