पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

पुण्यातील टेकडया हेरिटेज म्हणून जाहीर कराव्यात यासाठी पाठपुरावा करणार – मोकाटे

पुणे शहराचे पर्यावरण चांगले राहावे मुळा मुठा नदी स्वच्छ राहावी. प्रदूषणमुक्त पुणे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी रविवारी सांगितले पुण्यातील टेकडया हेरिटेज म्हणून जाहीर कराव्यात यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आणि त्यासाठी पुरातत्व खात्याकडे खास टेकड्यांचे संरक्षण करण्यासाठी खास कायदा करावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी एका शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

वेताळ टेकडी बचाव कृती समिती व पुणे रिव्हर्स रिव्हायल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी श्री मोकाटे यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कचेरीत भेट घेऊन पुण्यातल्या पर्यावरण, नदी सुधार योजना आदीविषयी चर्चा केलीया चर्चेत श्री मोकाटे यांच्यासमवेत माजी नगरसेवक प्रशांत बधे, विकास पासलकर, तर स्वयंसेवी संस्थातर्फे प्राजक्ता महाजन, प्रिती पुष्पा प्रकाश, सुनिल काळे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते या चर्चेत स्वयंसेवी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवाराना भेटून पुणे शहराचे पर्यावरण चांगले राहावं. नद्या शुद्ध व स्वच्छ व्हाव्यात आदी समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी भेटून मागणी करत असल्याचे सांगितले.

श्री मोकाटे यांनी या सर्व पदाधिकारीबरोबर चर्चा करताना सांगितलं की मी पुणे शहराच्या पर्यावरनाविषयीं अतिशय जागरूक आहे पुणे महापालिकेच्या सर्वसाधारणसभेत व विधिमंडळ अधिवेशनात याविरुद्ध आवाज उठविला आहे. यापुढेही त्यासाठी प्रयत्न करेन असे त्यांनी या शिष्टमंडळास सांगितलं दरम्यान आज प्रचाराच्या काळात पहिला रविवार असल्यामुळे श्री मोकाटे डहाणूकर कॉलनीत लक्ष्मी नगर, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, मावळे आळी आदी भागातील नागरिकांबरोबर पदयात्रेद्वारे संपर्क साधला.

नंदू घाटे, पुणे शहर राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) युवक काँग्रेस प क्षाचे अध्यक्ष किशोर कांबळे, योगेश निंबरे, अजय भुवड, जगदीश दिघे, नाना पासलकर, कांता बराटे, अमित थोपटें, मारुती फेंगसे, अमोल पवार आदी या पदयात्रेता सहभागी झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!