आंबेडकरी समाज एकजुटीने महायुती सोबत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रॅली
पुणे : मागील दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देत विकासाच्या मार्गावर आहे. विरोधक संविधानाच्या मुद्द्यावर समाजात फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. मात्रअ आंबेडकरी समाजाला माहीत आहे संविधान शक्य नाही, यामुळे आंबेडकरी समाज एकजुटीने महायुती सोबत आहे, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे यांची कामगिरी उत्तम आहेत त्यांचा विजय निश्चित आहे, कारण आरपीआय त्यांच्या सोबत आहेत असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
भाजप महायुतीचे पुणे कॅंटॉन्मेंट मतदारसंघातील उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ भिमशक्ती चौक, ताडीवाला रोड येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रॅली चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. या रॅली मध्ये भाजपाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे प्रभारी सि. टी. रविजी, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक प्रदीप गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) चे प्रदेशाचे नेते बाळासाहेब जानराव, नेते पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर अध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका हिमालीताई कांबळे, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष संदीप धांडोरे, नेते बस्वराज गायकवाड, नेते महेंद्र कांबळे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील कांबळे म्हणाले, मागील पाच वर्षात कॅंटॉन्मेंट मधील अनेक समस्या सोडविण्यात आम्हाला यश आले आहे. तरुणांच्या हातात काम असेल तर देशाचा विकास होतो. म्हणूनच केंद्र सरकारच्या कौशल्य विभाग आणि आपल्या संकल्पनेतून तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने कॅन्टोन्मेंट मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते, या मेळाव्यात जवळपास 6000 लोकांनी आणि शंभरहून अधिक नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
या मेळाव्याच्या माध्यमातून अडीच हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यातही कॅंटॉन्मेंटचा विकास करण्यासाठी मतदार संधी देतील असा विश्वास कांबाळे यांनी यावेळी व्यक्त केला.