पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

‘पर्वती फर्स्ट’ मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट!

एकत्र येऊ,आपले प्रश्न आपणच सोडवू: आबा बागुल

पुणे: पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी इंजिनिअर, वास्तुविशारद, पर्यावरणतज्ज्ञ, डॉक्टर्स, वकील, शिक्षणतज्ञ, टाउनप्लँनेर, नगरनियोजक, समाजसेवक, उद्योजक आदींसह विविध तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ‘पर्वती फर्स्ट’च्या माध्यमातून विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसह आर्थिक स्वावलंबन, सुविधांनाही अग्रक्रमाने प्राधान्य असणार आहे. पहिल्या वर्षांपासून ती अंमलात येणार आहे.त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी हिरा निशाणीसमोरील बटन दाबून ‘पर्वती’च्या रखडलेल्या विकासाला गती द्यायची आहे. असे आवाहन अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी केले आहे.

आबा बागुल यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा, मतदारांच्या गाठीभेटीतून पर्वती मतदार संघाच्या विकासासाठी मांडल्या जाणाऱ्या आश्वासक व्हिजनला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या व्हिजनबाबत माहिती देताना आबा बागुल म्हणाले की, पर्वती मतदारसंघाच्या सुनियोजित विकासाला चालना देण्यासाठी ‘पर्वती फर्स्ट’च्या माध्यमातून एक रोडमॅप तयार आहे.

त्यानुसार पुणे महापालिका व राज्यसरकारच्या जागा उपलब्ध करून घेतल्या जाईल. या जागांवर लोकोपयोगी प्रकल्पांची उभारणी होणार आहे. त्यासाठी निधी उभारणीबाबतही नियोजन झालेले आहे. शाळा, रुग्णालये, युथ सेंटर आदी विविध प्रकल्पातून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आज मुबलक पिण्याचे पाणी पुरवता येत नाही,हे दुर्दैव आहे. त्यामुळे मतदारसंघात सर्वत्र समान आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ‘ऑनलाईन वॉटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम’ सारखी योजना निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. वाहतूक कोंडी, वाढत्या प्रदूषणामुळे आज नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. त्यातून मुक्तता करण्यासाठीही ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘एआय ‘तंत्रज्ञानावरील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा बसवली जाणार आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहराच्या प्रवेशद्वारातून समजतो.

आपल्या ‘पर्वती’ला ४ प्रवेशद्वार आहेत.ते आकर्षक व विविध रंगात साकारणार आहोत. त्यामुळे पर्वती मतदार संघाची प्रतिमा निश्चित उंचविणार आहे. आपले आणि भावी पिढीचे जीवनमान उंचावण्यासाठी आता हीच वेळ आहे, बदल घडवायची. त्यामुळे कुणावरही विसंबून न राहता,एकत्र येऊ आणि आपले प्रश्न आपणच सोडवू यासाठी हिरा निशाणी समोरील बटन दाबून पर्वती मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासाला चालना द्यायलाच हवी असेही आबा बागुल म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!