पुणेमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मनविसे चा सी.बी.एस.ई. ला ईशारा

पुणे : १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करणेबाबत चे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आले. १९ फेब्रुवारी हा छत्रपती शिवरायांचा जयंती संपूर्ण देशात उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी सीबीएसई बोर्डाने वेळापत्रकात संस्कृत विषयाचा पेपर नियोजित केला आहे.

बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन करताना राज्यातील शासकीय सुट्ट्यांबाबत विचार केला जातो सीबीएसई बोर्ड मात्र जाणीवपूर्वक असे कृत्य करत आहे.छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृत सुट्टी जाहिर केलेली असताना सीबीएसई बोर्डाने राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधणे आवश्यक होते.सीबीएसई बोर्ड कडुन महाराष्ट्राच्या दैवताचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे अशी आमची भावना झाली आहे असे या निवेदनात नमूद आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या दिवशी परीक्षा होऊ देणार नाही. आपण तात्काळ सीबीएसई बोर्डा ने १९ फेब्रुवारी ची परीक्षा रद्द करण्याचे त्वरित आदेश द्यावेत.अशी विनंती आज केंद्रिय माध्यमिक शिक्षण बोर्ड चे प्रादेशिक अधिकारी श्री राम वीर यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी केलेली चुक हि निर्दशनास आणुन दिली आहे त्यांनी त्यांच्या दिल्ली मधील मुख्य कार्यालय यांना त्वरीत कळवुन परीक्षा पुढे ढकलण्याचे आश्वासन दिले आहे.

काल मनविसे सरचिटणीस श्री संदिप पाचंगे यांनी हि मागणी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना हि केली आहे. या वेळी शिष्ठ मंडळात आशिष साबळे पा., ॲड सचिन पवार, रुपेश घोलप, सुनिल कदम, बाळासाहेब शिंगाडे, किर्ती माचरेकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!